मुंबई(रमेश औताडे) : ज्यातील सुरक्षा रक्षकांच्या प्रलंबित प्रश्नावर व कल्याणकारी योजनेवर योग्य तो निर्णय घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन कामगारमंत्री आकाश फुंडकर यांनी मंत्रालयात एका बैठकीदरम्यान दिले. महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले व आमदार किसान कथोरे यांच्या पुढाकाराने या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
पोलिसांच्या गणवेशासारखा न दिसणारा मंडळाच्या सुरक्षा रक्षकांचा गणवेश वेगळा कसा दिसेल यासाठी नव्याने नियमावली करणे, २७ मार्च २०२५ रोजीचा जो शासन निर्णय आहे तो नव्याने बदल करून लवकरच सादर करणे, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरी नियमन व कल्याण अधिनियमन १९८१ व योजना २००२ याची प्रभावी अंमलबजावणी संदर्भात निर्णय घेणे, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरी नेमणूक कल्याण योजना सुधारित २००२ मधील खंड १४ व १५ यामध्ये सुधारणा रद्द करून पूर्वीची तरतूद लागू करणे, राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कर्मचारी व अधिकारी यांची तातडीने नियुक्ती करण्यात येणार आहे.
मंडळाच्या नोंदीत आस्थापना मध्ये खाजगी सुरक्षा रक्षक कर्तव्य बजावतात त्या आस्थापनावर कायदेशीर कारवाई करणे व त्या सुरक्षा रक्षकांची मंडळात नोंदणी करणे, रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात ७ वर्षापासून जे सुरक्षा रक्षक प्रतीक्षा यादीवर आहेत त्यांचा प्रश्न मार्गी लावणे, राज्य कामगार विमा योजने बाबत स्लॅब वाढविण्यात येणार आहे. अनुकंपाचा विषय मार्गी लावण्यात येईल.वेळ पडल्यास मुख्यमंत्र्याकडे बैठक लावू असे आमदार किसन कथोरे व फुंडकर यांनी सांगितले. यावेळी प्रधान उपसचिव कापडणीस, अप्पर सचिव वनेरे तसेच सुरक्षा अधिकारी प्रविण विटेकर सह पदाधिकारी उपस्थित होते