प्रतिनिधी: काव्ययोग काव्य संस्था लातूर जिल्हा आयोजित गणेशोत्सवानिमित्त विघ्नहर्ता काव्योत्सव लातूर cocsit कॉलेज येथे दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी पार पडला.यावेळी स्वागताध्यक्ष डॉ.शंकर चामे तसेच कवी अजयकुमार वंगे,
कार्यक्रम अध्यक्ष डॉ.एम.आर.पाटील अध्यक्ष रॉयल एज्युकेशन सोसायटी लातूर , उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक मा. योगिराज माने अध्यक्ष म. सा. प.लातूर , कवी संमेलन अध्यक्ष ॲड.विजयकुमार कस्तुरे ज्येष्ठ साहित्यिक, विशेष उपस्थिती मा.सविता धर्माधिकारी अध्यक्षा आम्ही लेखिका लातूर, मा.दत्ता घारगे शारदा इंटरनॅशनल स्कूल लातूर प्रमुख पाहुणे डॉ.बबन महामुने ज्येष्ठ कथाकर, मा. वर्षाराणी मुस्कावाड, युवा कवी मा.विजयकुमार पांचाळ आदि मान्यवर उपस्थित होते.
राज्यस्तरीय कविसंमेलमध्ये ५० कवींनी वेगळवेगळ्या जिल्ह्यातून सहभाग घेतला होता.तसेच काही निवडक लोकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.प्रत्येक कवीला सन्मानचिन्ह , सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.
उद्घाटक मा. योगिराज माने सरांनी आपण कविता कशी लिहावी,कशी शब्दरचना असावी,का लिहावी,त्याचे वेगवेगळे पैलू सांगितले.त्यांच्या स्वरचित कवितेतून उदाहरणे सुद्धा दिली.त्यांचे मनोगत सर्व श्रोते तसेच कवी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते.शेवटी त्यांनी सांगितले की,कवितेला व्याकरण नाही तर अंत:करण असावे लागते.ती कविता अंत कारणातून यावी लागते.असे सुंदर मनोगत पर भाषण दिले.तसेच कवी संमेलन अध्यक्ष ॲड विजयकुमार कस्तुरे यांनी आपल्या प्रसिद्ध गझलेतून तरुण पिढीला एका प्रेम विश्वात घेऊन गेले.तसेच विशेष उपस्थिती सविता धर्माधिकारी यांनी आपली वैज्ञानिक दृष्टीकोनातून रचना सादर केली.प्रमुख पाहुणे मा. वर्षाराणी मुस्कावाड यांनी आपल्या सावित्रीमाईचे गोडवे गायले.प्रमुख पाहुणे डॉ.बबन महामुने यांनी आपल्या एकपात्री कथेतून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध युवा कवी श्रीशैल सुतार तसेच काव्ययोग काव्य संस्था लातूर जिल्हा महिलाध्यक्षा श्रीमती अन्नपूर्णा गंगणे यांनी केले.या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन काव्ययोग काव्य संस्था अध्यक्ष मा.योगेश हरणे,उपाध्यक्ष मा.गौरव पुंडे, सचिव तुषार पालखे,महिलाध्यक्ष मा.पल्लवी पवार,छाया कांबळे, संगम उबाळे,प्रमोद सूर्यवंशी आदी सदस्यांनी नियोजन केले.
तसेच आभार प्रदर्शन मा.अस्मिता तिगोटे यांनी केले.
कवितेला व्याकरण नाही तर अंतःकरण असावे लागते
RELATED ARTICLES