मुंबई : सोमवार दिनांक 25 ऑगस्ट मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून दररोज लाखो नागरिक येथे प्रवास करतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील बहुतांश उड्डाणपूल व रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. हे उड्डाणपूल महाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळ (एम.एस.आर.डी.सी.) च्या अखत्यारीत येतात.
पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून वाहतुकीची भीषण कोंडी निर्माण होते. यामुळे दररोज प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाया जातो रुग्णवाहिका तासन्तास अडकून राहतात
अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते .नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण होतो.
या गंभीर परिस्थितीविरोधा आज बांद्रा येथील एम.एस.आर.डी.सी. कार्यालयात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली ॲम्बुलन्स घेऊन अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाद्वारे मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्या मुंबईतील सर्व उड्डाणपूल व प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करावी.अपघात टाळण्यासाठी त्वरित तात्पुरत्या दुरुस्तीची उपाययोजना करावी.खड्डा दुरुस्तीसाठी आतापर्यंत किती निधी खर्च झाला याची संपूर्ण आकडेवारी पारदर्शकपणे जाहीर करावी.भविष्यात उड्डाणपुलांची गुणवत्ता व देखभाल सुनिश्चित करण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
पार्श्वभूमी गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा सण काही दिवसांत सुरू होणार असून लाखो भाविक मोठ्या प्रमाणावर रस्ते व उड्डाणपुलांवरून प्रवास करतील. खड्डेमुळे वाहतूक कोंडी व अपघातांचे संकट अधिक वाढण्याची शक्यता असल्याने हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाच्या माध्यमातून राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्ष ने राज्य सरकार व एम.एस.आर.डी.सी. प्रशासनाला मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष ॲड.अमोल मातेले, उपाध्यक्ष ओमकार शिर्के,जिल्हाध्यक्ष कैलास कुशेर ,सचिन लोंढे आणि इमरान तडवी, सेलवेन देवेंद्र, हनीफ पटेल, वैभव पांचाळ, कमलेश दांडेकर , लक्ष्मण बाजी स्वप्निल पाटील यांनी त्वरित ठोस पावले उचलण्याचा इशारा दिला आहे.