मुंबई(रमेश औताडे) : जर युद्धाचा विचार मनात असेल तर शांततेचा विचार त्यात कसा नांदु शकेल. त्यामुळे मानवजातीला एक कुटुंब मानत पूर्वग्रहांचा नाश केला पाहिजे व सत्याचा स्वतंत्र शोध घेण्याचा बहाई सिद्धांत स्वीकारला पाहिजे.
इंटर रिलिजियस सॉलिडॅरिटी कौन्सिल यांच्या वतीने बहाई सेंटर येथे आंतरधर्मीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. विविध धर्मांच्या मान्यवर वक्त्यांनी या वेळी जागतिक शांततेबाबत धर्मसिद्धांतांमधील सामायिक शिकवणींवर विचार मांडले.
प्रभू केशवचंद्र दास (इस्कॉन), रणजित सिंग (बहाई मत), फादर गिल्बर्ट डी’लिमा (ख्रिश्चन धर्म), भंते बोधीशिल महाथेरो (बौद्ध/हिंदू धर्म), इरफान इंजिनिअर (इस्लाम) हे मान्यवर उपस्थित होते.
बैठकीची सुरुवात इस्कॉनच्या भावपूर्ण कीर्तनाने झाली. सूत्रसंचालन सीमा इंदोरवाला यांनी केले. “सर्व धर्मांशी मैत्री, सौहार्द व सभ्यतेने वागावे हा बहाई संदेश अधोरेखित करून एकतेचा आणि सहकार्याचा संदेश देण्यात आला.