मुंबई : देशातील सर्वसामान्यांना परवडणारी आणि प्रभावी पर्यायी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी इलेक्ट्रोपॅथी उपचार पद्धतीला राष्ट्रीय पातळीवर कायदेशीर मान्यता द्यावी, अशी मागणी ई-बायो केअर्स चे संस्थापक डॉ. जसविंदर सिंग यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. सिंग म्हणाले, “राजस्थान सरकारने १ मे २०२५ पासून राज्य इलेक्ट्रोपॅथी मंडळाची स्थापना करून या उपचार पद्धतीला कायदेशीर दर्जा दिला आहे. उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशसह अनेक राज्यांमध्येही याबाबत सकारात्मक हालचाली सुरू आहेत. केंद्र सरकारनेही राजस्थानच्या पावलावर पाऊल ठेवत देशभरात हा निर्णय अमलात आणावा.”
डॉ. सिंग यांनी ऑटिझम, स्पीच डिसऑर्डर आणि सेरेब्रल पाल्सीग्रस्त मुलांवर हर्बल व फ्लॉवर थेरपीद्वारे यशस्वी उपचार करून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. अॅलोपॅथीमध्ये ज्यांचे उपचार मर्यादित आहेत, अशा अनेक आजारांसाठी इलेक्ट्रोपॅथी हा नवा आशेचा किरण ठरू शकतो, असे ते म्हणाले.