Monday, August 25, 2025
घरमहाराष्ट्रगणेश भक्तांसाठी लालपरी सज्ज! लाल परी पनवेल मध्ये दाखल

गणेश भक्तांसाठी लालपरी सज्ज! लाल परी पनवेल मध्ये दाखल

पनवेल(अमोल पाटील) : गणेशोत्सव अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. व्यावसायिक नोकरवर्ग या उत्सवासाठी गावी जाण्यासाठी निघत आहेत. कोकणामध्ये गणेशोत्सवाला प्रचंड महत्त्व आहे. आपल्या आपल्या गावी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी कौटुंबिक भेटीसाठी आणि सणाचा आनंद घेण्यासाठी मुंबई ठाणे नवी मुंबई अशा विविध शहरातून कोकणाकडे गणेश भक्त जात असतात. मात्र गाड्यांना गर्दी असल्यामुळे वाहतूक कोंडीमुळे प्रवास त्रासदायक होतो. गणेश भक्तांना तर कधीकधी प्रवासात उभे राहून जावे लागते.
याच पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने गणेश भक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी विशेष पावले उचलून लातूर जिल्ह्यातून १९५ बसेस मुंबईमध्ये दाखल झाल्या असून प्रवास अधिक सोयीस्कर व आरामदायी होणार आहे.
शनिवारी संध्याकाळपासून लालपरी बस मुंबईत दाखल होऊ लागल्या आहेत. या बसेस नवी मुंबई विमानतळाच्या शेजारील उलवे करंजाडे झाडे रस्त्यावर उभ्या करण्यात आले आहेत. या बसेस आल्यामुळे बस स्थानकावरील हालचालींना परिसरात उत्साही वातावरण तयार झाले आहे.
या विशेष नियोजनाची जबाबदारी पनवेल डेपो व्यवस्थापक ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडे सोपवले आहे. बसेस मधील चालक आणि कंडक्टर यांच्या राहण्याची जेवण्याची सोय पनवेल डेपो मार्फत करण्यात आली आहे. त्यामुळे कामकाज कोणत्याही अडचणी शिवाय पार पडणार आहे. यामुळे दादर ठाणे कल्याण वाशी पनवेल यासारख्या गर्दीच्या भागातील प्रवाशांना थेट आपल्या भागात बस मिळणार आहे. प्रवाशांसाठी जवळच्या बस स्थानकातून बस मिळणार असल्याने प्रवासाचा ताण कमी होणार आहे.
कोकणात गणेशोत्सवाला प्रचंड महत्व असते घराघरात बापाचे प्रतिष्ठापना होत असल्याने या दिवसात कोकणात कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी मुंबई पुण्यासारख्या शहरातून लाखोंच्या संख्येने प्रवासी गावी जातात. कोकणात जाण्यासाठी रेल्वेचे तिकिटे काही मिनिटात संपतात तर खाजगी वाहतुकीचे गगनाला मिळतात आणि महामार्गावर लांबच लांब रांगा लागतात. पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा खाजगी वाहतुकीचे दर दुपटीने आकारले जातात.
कोकणाकडे जाण्याचा मार्ग बिंदू पनवेल असल्यामुळे चालक कर्मचारी यांची व्यवस्था पनवेल या ठिकाणी राहण्याची जेवणा खाण्याची करण्यात आली आहे. कोकणात रात्री दिवस बस फेऱ्या होणार असल्यामुळे पनवेल मध्ये विश्रांतीसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी सुद्धा कमी होणार आहे व गणेश भक्तांना यावर्षी आरामदायी व सुखकर प्रवास होणार आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments