प्रतिनिधी : राज्य शासनाच्या इतर कर्मचाऱ्याप्रमाणे एसटीच्या सुमारे ८३ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचा वेतन गणपती उत्सवापूर्वी देणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी दिली.
मंत्री सरनाईक म्हणाले की, एसटीच्या कर्मचाऱ्यांचा पगार हा महिन्याच्या ७ तारखेपासून १० तारखेच्या दरम्यान होत असतो. परंतु यंदा गणपती उत्सव हा ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आल्याने केवळ वेतनामुळे त्यांचे उत्सवाच्या आनंदावर विरजण पडू नये! म्हणून राज्य सरकारला एसटीच्या विविध सवलती पोटी ची प्रतिपुर्ती रक्कम लवकर देण्याची विनंती केली. त्यानुसार २५ ऑगस्ट रोजी या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून, लवकरच एसटीच्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बॅक खात्यांवर त्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन जमा होईल!
आपले सण-उत्सव साजरे न करता सर्वसामान्य प्रवासी जनतेसाठी अहोरात्र राबणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना यंदाचा गणेशोत्सव अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा करता यावा हीच सदिच्छा.
एसटीच्या सर्व अधिकार व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!