इस्लामपूर (विजया माने) : राजयोगिनी दादी प्रकाशमणी यांचा अठरावा स्मृतिदिन व विश्वबंधुत्व दिन निमित्त समाजसेवा प्रभाग व ब्रह्माकुमारी इस्लामपूर सेवाकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन मा. श्री. संजय हारुगडे (पोलीस निरीक्षक, इस्लामपूर पोलीस ठाणे), मा. श्री. शुभम यादव (उद्योजक), मा. श्री. ज्ञानेश्वर हुबाले (उद्योजक), मा. श्री. अजित माळी (प्राचार्य) तसेच सुखदेव वाकळे (पोलीस पाटील, रेठरे हरणाक्ष) यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. इस्लामपूर सेवाकेंद्राच्या संचालिका बी.के. शोभा दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
22 ते 25 ऑगस्ट 2025 दरम्यान अखिल भारतीय स्तरावर तसेच नेपाळमध्ये हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून, मानवतेच्या सेवेसाठी आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी ब्रह्माकुमारी संस्थेचा हा उपक्रम उल्लेखनीय ठरत आहे.
इस्लामपूर येथील शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूर संचलित प्रकाश ब्लड बँक यांच्या सहकार्याने एकूण ४० युनिट रक्तसंकलन करण्यात आले. या उपक्रमाबद्दल उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले व अधिकाधिक लोकांनी रक्तदान करून समाजसेवेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले.