कराड(प्रताप भणगे) : कराड तालुक्यातील प्रख्यात स्वातंत्र्य सेनानी बाळकृष्ण आनंदराव पाटील उर्फ दादा उंडाळकर यांनी 24 ऑगस्ट 1942 रोजी ‘इंग्रजांना चले जावो’ असा कडवा संदेश देत तीन हजार लोकांना एकत्र करून कराडच्या मामलेदार कचेरीवर मोर्चा काढला होता. स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील हा मोर्चा हे सुवर्णपान मानले जाते.
या ऐतिहासिक क्रांती दिनास 79 वर्षे पूर्ण होत असल्याने आज दादा उंडाळकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला दादांचे नातू, माजी जिल्हा परिषद सदस्य अॅड. आनंदराव जयसिंगराव पाटील (राजाभाऊ), प्रांत अधिकारी अतुलजी म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, नायब तहसीलदार राठोड साहेब, नायब तहसीलदार पंडित पाटील, तसेच धनाजी पाटील, विशाल माळी, कल्याण कुलकर्णी यांसारखे मान्यवर उपस्थित होते.
कराडवासीयांसाठी हा दिवस स्वातंत्र्य संग्रामातील शौर्य, त्याग आणि क्रांतीची आठवण करून देणारा ठरला.