प्रतिनिधी(विजया माने) : प्रजापिता ब्रह्माकुमारीज कराड सेवाकेंद्र आणि लायन्स क्लब कराड यांच्यावतीने दिनांक 22 ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला खुप छान प्रतिसाद मिळाला. तब्बल 81 माता-बंधू-भगिनींनी रक्तदान केले. लायन्स क्लबचे सर्व सदस्य तसेच प्रजापिता ब्रह्माकुमारीज या साधकांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अविरत प्रयत्न केले.
रक्तदान शिबिरात एका वेळी एवढे रक्तदाते मिळणे, येणे सोपे नसते. मात्र दोन्ही संस्थांचे समाजात असलेले स्थान आणि या दोन्ही संस्थांच्या सदस्यांनी सामाजिक सदभावना ठेवून केलेल्या प्रयत्नामुळे हे शिबीर यशस्वी झाले, याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानते धन्यवाद देते. ब्रह्माकुमारीज माउंट आबू सोशल विंग व झोन आणि सबझोन मधील सर्व मान्यवरांनी आम्हाला मार्गदर्शन केले.
या शिबिरात ब्रह्माकुमारीज मधील समर्पित मनीषा बहेन, विद्या बहेन, उमा बहेन, सुजाता बहेन, सुप्रिया बहेन, पूजा बहेन, या सर्व बहिणींनी रक्तदान केले.
व्हाट्सअप, फेसबुक या सोशल मीडियावर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन माझ्या कराड शहर व आजूबाजूच्या गावांमधून अनेक बंधू भगिनींनी या ठिकाणी येऊन रक्तदान केले, मी त्यांची ऋणी आहे. लायन्स मधील सर्व वरिष्ठ सहकारी यांनी सुद्धा रक्तदाते येण्यासाठी फार प्रयत्न केले. प्रजापिता ब्रह्माकुमारीज या केंद्रातील सर्व बहिणींनी रक्तदान शिबिरात स्वतःहून पुढाकार घेतला, ही आनंदाची गोष्ट आहे
प्रारंभी सकाळी दहा वाजता या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी आमदार आनंदराव पाटील, पोलिस उपनिरीक्षक रेखा देशपांडे, लायन्स क्वेस्टचे चेअरमन महेश खुस्पे, प्रजापिता ब्रह्माकुमारीज कराड सेवा केंद्राच्या संचालिका बी के उषा दिदी, तसेच लाइन्स क्लब कराडचे अध्यक्ष सतीश मोरे व यशवंतराव चव्हाण ब्लड बँकेचे डॉक्टर संदीप यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी वैष्णवी बहेन यांनी फार प्रभावपणे केले. तसेच मा. संदीप सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक कराड वाहतूक शाखा, आणि त्यांचे सहकारी यांनी ही या कार्यक्रमास भेट देऊन आपल्या शुभेच्छा दिल्या .