प्रतिनिधी(अमोल पाटील ) : हिंदू धर्मात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. महाराष्ट्रात या सणाला विशेष महत्त्व आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी १८९३ मध्ये पुण्यात गणेशोत्सव साजरा करण्याची सुरुवात केली. त्या मागे उद्देश हा होता की ब्रिटिश काळातील दडप शाळेतून लोकांना एकत्र आणून स्वातंत्र्यासाठी संघटित करणे. टिळकानी गणेशोत्सवाला सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय चळवळीचे स्वरूप दिले.
महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा अत्यंत महत्त्वाचा आणि लोक भावनेशी घट्ट जोडलेला उत्सव आहे. तो भाद्रपद महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला सुरू होतो आणि आनंद चतुर्थीला समाप्त होतो. म्हणजेच यावर्षी २७ऑगस्ट २०२५ रोजी गणेश चतुर्थी सुरू होत आहे. आणि आनंद चतुर्थी ६ सप्टेंबर २०२५ रोजी आहे.
या गणेशोत्सवासाठी सजावटीच्या साहित्यासाठी बाजारपेठ फुले आहेत. सजावटीमध्ये फुले शोच्या वस्तू इलेक्ट्रिक वस्तू धार्मिक पूजेसाठी साहित्य अशा अनेक वस्तूंचे खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग चालू झाली आहे. बाजारपेठेमध्ये मागील वर्षापेक्षा पाच टक्के दर सर्व वस्तूवर आकारल्याचे चित्र दिसत आहे.
गणपतीच्या सजावटी साहित्य खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या
RELATED ARTICLES