प्रतिनिधी : आयुर्विद्या प्रसारक मंडळ संचालित शेठ र. व. आयुर्वेदीय रुग्णालय, शीव अंतर्गत धारावी बाहयरुग्ण विभागाचे उद्घाटन समारंभ शुक्रवार, दि. २९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता आयोजित करण्यात आले आहे. हे उद्घाटन खासदार वर्षाताई गायकवाड व अनिल देसाई, आमदार डॉ ज्योतीताई गायकवाड यांच्या शुभहस्ते होणार आहे.
उद्घाटन सोहळ्यानिमित्त धारावीतील नागरिकांसाठी मोफत औषध तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर विजय शिवण क्लासेसच्या शेजारी,पाटील हाऊस च्या मागे, धारावी कोळीवाडा येथे होणार आहे.
आयुर्विद्या प्रसारक मंडळ ही धर्मादाय संस्था असून, अत्यल्प दरात उपचार सुविधा पुरविते. विशेषतः गरीब आणि गरजू रुग्णांसाठी येथे मोफत तपासणी, औषधोपचार, पंचकर्म, शस्त्रक्रिया आणि इतर आरोग्यसेवा उपलब्ध करून दिल्या जातात.
सर्व धारावीतील नागरिकांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सदर कार्यक्रम उपविभागप्रमुख जोसेफ कोळी यांच्या सतत करत असलेल्या पाठपुराव्यामुळे होत आहे. यासाठी त्यांनी स्वतः आपली जागा या आयुर्वेदिक रुग्णालयास उपलब्ध करून दिली आहे.