प्रतिनिधी :
कराड तालुक्यातील येळगाव येथे शिवछत्रपती प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असा शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येळगाव, गवारकरवाडी, मस्करवाडी येथील पहिली ते चौथीमधील एकूण 44 विद्यार्थ्यांना परिपूर्ण शैक्षणिक साहित्य, स्कूल बॅग, ट्रॅक सूट, टिफिन, पाण्याच्या बाटल्या व खाऊ यांचे वाटप करण्यात आले.
तसेच नेताजी सुभाषचंद्र विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स येथे शिक्षण घेणाऱ्या गरजू कुटुंबातील 15 विद्यार्थ्यांनाही अशाच प्रकारचे साहित्य आणि ट्रॅक सूट देण्यात आले.
या उपक्रमाची संकल्पना श्री. प्रशांत पाटील यांनी मांडली होती. सॅन्डोज मित्र परिवार, ओम साई मित्र मंडळ, सुवर्ण आशा फाऊंडेशन आणि शिवप्रेमी ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, शिवछत्रपती प्रतिष्ठान ग्रामीण भागातील गरजूंसाठी असेच कार्य पुढेही करत राहील असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
कार्यक्रमास शिवछत्रपती प्रतिष्ठानचे पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच समाजातील इतर संस्था व तरुणांनी अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.