कराड (प्रताप भणगे) :
तालुक्यातील कालेटेक येथील मुख्य स्टॉप परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून साचलेला कचरा स्वच्छ करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेतला. दयानंद पाटील भाऊ मित्र परिवार, राहुल यादव आणि प्रकाश मोरे यांच्या संयुक्त प्रयत्नातून स्वखर्चाने जेसीबीच्या मदतीने मोठ्या प्रमाणात घनकचरा हटवून परिसराची स्वच्छता करण्यात आली.
या उपक्रमामुळे परिसर स्वच्छ व आरोग्यदायी बनला असून नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे. “आपला परिसर आपणच स्वच्छ ठेवला पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे,” असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांनी केले.
या मोहिमेनंतर परिसरातील नागरिकांनी देखील स्वच्छतेबाबत जागरूक राहण्याचे आश्वासन दिले आहे.