कराड(प्रताप भणगे) : इनरव्हील क्लब ऑफ कराड संगम यांच्या सौजन्याने शाहू चौक, कराड येथे वाहतूक नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. आगामी गणेशोत्सवात होणारी गर्दी टाळण्यासाठी व वाहतूक कोंडी रोखण्यासाठी ही प्रभावी उपाययोजना राबविण्यात आली असून यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
या नियंत्रण कक्षातून शहरातील महत्त्वाच्या चौकांवरील वाहतूक नियंत्रणासाठी समन्वय साधला जाणार आहे. वाहतूक पोलिसांना यामुळे आवश्यक ती मदत मिळून रस्ते सुरळीत ठेवणे शक्य होईल. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान तसेच गर्दीच्या ठिकाणी त्वरित उपाययोजना करता यावी, यासाठी हा कक्ष उपयुक्त ठरणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिस प्रशासन व इनरव्हील क्लबतर्फे करण्यात आले आहे.