Thursday, August 21, 2025
घरमहाराष्ट्रसदाशिवगड–चौरंगीनाथ ट्रेकिंग मोहिमेत ३३० ट्रेकर्सचा उत्स्फूर्त सहभाग

सदाशिवगड–चौरंगीनाथ ट्रेकिंग मोहिमेत ३३० ट्रेकर्सचा उत्स्फूर्त सहभाग

कराड – शिवराय प्रतिष्ठान कराड (कार्य हीच ओळख) या संस्थेतर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षीदेखील सदाशिवगड ते चौरंगीनाथ अशी २० किमीची ट्रेकिंग मोहीम उत्साहात पार पडली. या मोहिमेत वय वर्षे ५ ते ७२ पर्यंतचे ३३० महिला-पुरुष ट्रेकर्स सहभागी झाले.

सोलापूर, मंगळवेढा, सातारा, लिंब, विटा, कोरेगाव, मिरज, उंब्रज व कराड तालुका या विविध ठिकाणांहून ट्रेकर्सनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मोहिमेदरम्यान जर्सी, चहा-बिस्कीट, पाणी, जेवण, सर्टिफिकेट, मेडिकल सुविधा आणि परतीसाठी वाहतूक या सर्व सोयी प्रतिष्ठानकडून उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

या मोहिमेचे हे सलग पाचवे वर्ष असून, महिला व बालमंडळींचा विशेष सहभाग ही या उपक्रमाची खास वैशिष्ट्ये ठरली. कडेपूरचे श्री. ऋषीकेश यादव यांनी मावळ्याच्या वेशात येऊन सर्वांचे लक्ष वेधले. त्यांच्या ग्रुपमधील तरुण महाराष्ट्रातील गावोगाव फिरून मावळ्यांची जीवनशैली प्रत्यक्षात अनुभवण्याचा प्रयत्न करत आहेत.

मोहीम यशस्वी होण्यासाठी शिवराय प्रतिष्ठानचे आयोजक, संयोजक व स्वयंसेवक यांचे विशेष प्रयत्न लाभले. या उपक्रमासाठी कृष्णा स्कूल ज्युनियर कॉलेज, राज मेडिकल व श्री. महेंद्र काशिद यांचे सहकार्य लाभले.

माफक दरात अशा मोहिमा आखल्याने लोकांचा विश्वास आणि सहभाग दिवसेंदिवस वाढत असून, शिवराय प्रतिष्ठान कराडची ओळख समाजात अधिक दृढ होत आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments