Thursday, August 21, 2025
घरमहाराष्ट्रकोकण रत्न पदवीसाठी नामांकन पाठविण्याचे आवाहन

कोकण रत्न पदवीसाठी नामांकन पाठविण्याचे आवाहन

प्रतिनिधी(शांताराम गुढेकर) : स्वतंत्र कोकणराज्य अभियान अंतर्गत विविध श्रेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 10 भगिनी आणि 25 कोकणी बांधवाना शनिवार 13 डिसेंबर 2025 रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ, दुसरा मजला, महापालिका मार्ग, आझाद मैदान शेजारी मुंबई येथे दुपारी 4 ते 6 या वेळेत कोकण रत्न पदवी प्रदान करण्यात येणार आहे. या मध्ये गोल्ड प्लेटेड मेडल, आकर्षक फ्रेम मध्ये कोकण रत्न पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल
कोकण रत्न पदवीसाठी संजय कोकरे संस्थापक / अध्यक्ष 9224443119, 2) धंनजय कुवेसकर मुंबई अध्यक्ष 9869076602, 3) सुखदेव पवार संघटक 8082769 091 यांच्या व्हाट्सअॅप नंबरवर आपले नामांकन पाठवावे असे आवाहन स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचे संस्थापक / अध्यक्ष संजय कोकरे यांनी केले आहे. तसेच कोकण रत्न पदवीसाठी कुठल्याही प्रकारची फी आकारली जात नाही याची नोंद घेण्यात यावी. असे देखील कोकरे यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments