Wednesday, August 20, 2025
घरमहाराष्ट्ररस्त्यावरील खड्ड्यांमध्ये झाडे लावून पालिकेचा निषेध

रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये झाडे लावून पालिकेचा निषेध

मुंबई (रमेश औताडे) : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. पावसाळा सुरू होताच रस्ते खचले, खड्ड्यांनी प्रवाशांना धोक्याचा सामना करावा लागत आहे. मात्र तरीही पालिकेचे अधिकारी व कंत्राटदार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.

या बेजबाबदार कारभाराविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरद पवार पक्ष) जिल्हा अध्यक्ष सचिनभाऊ लोंढे यांनी अनोखा मार्ग अवलंबला आहे. लोंढे यांनी खड्ड्यांमध्ये झाडे लावण्याचा उपक्रम सुरू केला असून, “खड्डे बुजवले नाहीत, तर आम्ही थेट अधिकाऱ्यांच्या खुर्च्यांवर डांबर टाकून तिथे झाडे लावू” असा इशारा दिला आहे.

लोंढे म्हणाले, “प्रत्येक पावसाळ्यात रस्त्यांची दुर्दशा होते. नागरिकांच्या जीवाशी खेळ होत आहे, अपघात वाढत आहेत. पण कंत्राटदारांना दंड न करता उलट त्यांनाच पुन्हा कामे दिली जातात. त्यामुळे जनतेचा संताप वाढत आहे. आम्ही या विरोधात रस्त्यावर उतरून खड्ड्यांत झाडे लावण्यास सुरुवात केली आहे.”

स्थानिक नागरिकांनी या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला असून, “झाडे लावणे ही पर्यावरणपूरक चळवळ असली तरी ती खड्ड्यांत लावावी लागते, ही पालिकेच्या निष्क्रियतेची लाजिरवाणी गोष्ट आहे” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.

कदम यांनी पुढील काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवरील खड्ड्यांत झाडे लावण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. तसेच “जोपर्यंत पालिका व कंत्राटदार जबाबदारी घेत नाहीत, तोपर्यंत हा आंदोलनात्मक मार्ग कायम राहील” असे त्यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments