तळमावले/वार्ताहर : स्पंदन सांची प्रकाशनाच्या वतीने प्रथमच ‘दीपस्तंभ’ हे फोटोबायोग्राफी बुक तयार केले आहे. या पुस्तकात संदीप डाकवे यांच्या शालेय जीवनापासून आतापर्यंतचा संपूर्ण जीवनप्रवास मोजक्याच फोटोच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. शालेय, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय, एटीडी, वरिष्ठ महाविद्यालय, बीजे-एमजे, ग्राफीक्स डिझायनींग, कृषी पत्रकारिता पदविका इ.शैक्षणिक आठवणींचा यात समावेश आहे.
याशिवाय संदीप डाकवे यांना महाराष्ट्र राज्य शासनाचे 6 व विविध संस्थाकडून मिळालेल्या पुरस्कारांचे फोटो, सन्मानचिन्हे, प्रशस्तीपत्रे इत्यादींचा यात अंतर्भाव आहे. त्यासोबत आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला क्षेत्रातील विविध दिग्गज मान्यवरांसमवेतचे फोटो, प्रकट मुलाखतीचे क्षण, कलेमध्ये केलेले विविध प्रयोग, स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने राबवण्यात आलेले सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम, इलेक्ट्राॅनिक मिडीयाकडून घेतलेली दखल इत्यादींच्या फोटोंचा यात समावेश केला आहे. सदर फोटोबायोग्राफी बुक पाहिल्यानंतर आपणांस संदीप डाकवे यांचा जीवनप्रवास अनुभवता येणार आहे.
आतापर्यंतच्या सर्व फोटोमय आठवणी पुस्तकाच्या रुपाने प्रसिध्द व्हाव्यात अशी संकल्पना मनामध्ये आली. यातून हे अनोखे फोटोग्राफी बुक साकारले असल्याची माहिती संदीप डाकवे यांनी दिली आहे. डाकवे यांचे हे सहावे फोटो बुक असून 2 फोटो बुक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. स्पदंन सांची प्रकाशनाने हे आगळेवेगळे पुस्तक तयार करुन पुस्तक निर्मितीत आपली छाप उमटवली आहे. हे अनोखे पुस्तक लोकांच्या पसंतीस पडेल असा विश्वास संदीप डाकवे यांनी व्यक्त केला आहे.संदीप डाकवे यांची प्रकाशित पुस्तके :
मनातलं, जलयुक्त शिवार अभियान, समाज स्पंदनाची पत्रे, तात्या (पुस्तके), तात्यांची स्पंदने (ई-बुक), दीप उजळतो आहे, स्नेहबंध, गाठीभेटी, स्मृतिगंध, तीर्थरुप तात्या (फोटो बुक), स्पंदन कवी मनांचं, ज्ञानयात्री (संपादन) अशा 12 पुस्तकांची निर्मिती स्पंदन प्रकाशनने केली आहे.
संदीप डाकवे यांचे ‘दीपस्तंभ’ पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर
RELATED ARTICLES