Wednesday, August 20, 2025
घरआरोग्यविषयकधारावीत मुसळधार पावसात लायन तारचंद बापा हॉस्पिटलतर्फे गर्भवती महिलांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा

धारावीत मुसळधार पावसात लायन तारचंद बापा हॉस्पिटलतर्फे गर्भवती महिलांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा

मुंबई : धारावी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या कठीण परिस्थितीत लायन तारचंद बापा हॉस्पिटलने पुढाकार घेत गर्भवती महिलांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली.पावसामुळे रुग्णालयात पोहोचणे कठीण झालेल्या अनेक गर्भवती महिलांना या सेवेचा लाभ मिळाला. स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत हॉस्पिटल प्रशासनाचे आभार मानले आहेत.हॉस्पिटल प्रशासनाकडून कळविण्यात आले की, “आपत्कालीन परिस्थितीत गर्भवती महिलांना वेळेत वैद्यकीय मदत मिळणे गरजेचे आहे. म्हणूनच आम्ही ही सेवा सुरू केली असून पावसाळा संपेपर्यंत ही सुविधा सुरू राहील.असे कळविण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments