Wednesday, August 20, 2025
घरमहाराष्ट्रअपघातग्रस्त गोविंदांना प्रताप सरनाईक यांचा दिलासा

अपघातग्रस्त गोविंदांना प्रताप सरनाईक यांचा दिलासा

मुंबई : दहिहंडी उत्सवात जखमी झालेल्या गोविंदांच्या वर के.ई.एम. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज के.ई.एम रुग्णालयात जाऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जखमी गोविंदाची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला.

त्यांच्याशी संवाद साधताना मंत्री सरनाईक म्हणाले की, दुदैवाने दहिहंडी उत्सवात जोखिम जास्त असल्याने अनेक गोविंदा जखमी होतात. गेली २९ वर्षापेक्षा अधिक काळ दहीहंडी उत्सवाच्या काळात जखमी झालेल्या गोविंदांना योग्य उपचार मिळावेत यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.
सध्या दहिहंडी उत्सवात जखमी झालेल्या गोविंदांना रुग्णालयात उपचार करण्यासाठी राज्य सरकारतर्फे एक लाख रुपये पर्यंत मदत दिली जाते. या माध्यमातून मुंबई, ठाणे आणि इतर उपनगरात उत्सवाच्या काळात जखमी झालेल्या सुमारे ९५ गोविंदांच्या वर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. यापैकी अनेक गोविंदां वर यशस्वी उपचार करुन सूखरुप घरी सोडण्यासाठी दहिहंडी समन्वय समितीच्या सदस्यांनी जीवापाड मेहनत केली आहे. त्यांचे देखील कौतुक आहे. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.
आज ७ गोविंदा खेळाडू हे के.ई.एम. रुग्णालय मध्ये हस्तिरोग तज्ञ डॉ. मोहन देसाई यांच्या देखरेखीखाली उपचार घेत होते.
जखमी गोविंदांना धीर देताना मंत्री सरनाईक म्हणाले ” अपघात कितीही गंभीर असला तरी गोविंदाचा आत्मविश्वास कधीच ढळत नाही. उपचार घेणाऱ्या गोविंदांनी काही टेन्शन घेऊ नये, आपण कायम त्यांच्या पाठीशी उभे राहू.

गोविंदांचा जोश, ताकद आणि मनोबल हेच दहीहंडीच्या परंपरेचं खरं वैशिष्ट्य आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहणं हीच खरी गरज आहे.

प्रताप सरनाईक
मंत्री परिवहन

यावेळी युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक, दहीहंडी समन्वय समितीचे बाळा पडेलकर व इतर सदस्य यांच्या सह के.ई.एम. रुग्णालयाचे डॉ. हसमुख रावत डॉ.प्रवीण बांगर हे उपस्थित होते.

(अभिजीत भोसले)
जनसंपर्क अधिकारी
मा. मंत्री परिवहन

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments