प्रतिनिधी : अखिल भारतीय मातंग सेनेचे अध्यक्ष योगेश शिंदे यांच्या वतीने जय लहुजी पिवळी दहीहंडी उत्सव अण्णाभाऊ साठे नगर, मानखुर्द येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यागमाता क्रांतीज्योती कुसुमताई गोपले यांच्या हस्ते मातंग समाजाचे नेते सुदाम आवाडे व पार्वती आवाडे यांना क्रांतीसम्राट डॉ. बाबासाहेब गोपले संघर्षनायक जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्याप्रसंगी अभिनेत्री कांचन लोखंडे, हरीबाई कांबळे, अश्विनी शिंदे, बी.जी. गायकवाड, बी. डी. चव्हाण, पी.एस. मोतेवाड, अशोक ससाणे, देवेंद्र खलसे, श्रावण नाटकर,नामदेव साठे, विष्णू गायकवाड, शाहीर रामलिंग जाधव, शाहीर सुनिल साठे, दिपक साठे, दत्तात्रय आवाडे आधी मान्यवर उपस्थित होते. समाजातील ऐक्य, जिद्द आणि परंपरा जपण्याचा संदेश या दहीहंडी सोहळ्यातून देण्यात आला.