मुंबई(रमेश औताडे) : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७८व्या वर्धापन दिनानिमित्त सांताक्रूज (पश्चिम) येथील भीमवाडा परिसरात बौद्धजन पंचायत समिती शाखा १५३ आणि ४३३ यांच्या संयुक्त विद्यमाने ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट मुंबई प्रदेश महासाचीब विवेक पवार, सरस्वती शिक्षण संस्था संचालित माता रमाई आंबेडकर ज्युनिअर कॉलेज चे संस्थापक अध्यक्ष तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या बौद्धजन पंचायत समिती, मुंबई या संस्थेचे गेली ३५ वर्ष विश्वस्त अशा मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. लहान मुलांना खाऊ वाटप व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.