Monday, August 18, 2025
घरमहाराष्ट्रज्येष्ठ वृत्तपत्रलेखक श्री चंद्रकांत पाटणकर यांचा सन्मान

ज्येष्ठ वृत्तपत्रलेखक श्री चंद्रकांत पाटणकर यांचा सन्मान

प्रतिनिधी : मुंबईतील ज्येष्ठ वृत्तपत्रलेखक श्री चंद्रकांत पाटणकर यांनी गेली अनेक वर्षे जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांसह सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील वैगुण्यावर निर्भीडपणे पत्रलेखन केले त्यांचे हे सामाजिक उत्तरदायित्व लक्षात घेऊन दैवज्ञ हितवर्धक समाज दादर मुंबई या संस्थेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. पाटणकर हे गेली तीस वर्ष सातत्याने सर्व वर्तमानपत्रातून पत्रलेखन करीत आहेत. त्यांच्या अनेक पत्रांची दाखल घेऊन संबंधित यंत्रणांनी निराकरण केले आहे,
त्यांच्या पत्रलेखनाचे पत्रप्रपंच या नावाने दोनदा पुस्तक रूपाने प्रकाशन झाले आहे, वृत्तपत्रलेखनाबद्दल त्यांना अनेक पुरस्काराने आजपर्यंत सन्मानित करण्यात आले आहे.
समाजश्रेष्ठी श्री दिनकर बायकेरीकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह,शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ आनंद पेडणेकर, गणेश नागवेकर, नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे सरचिटणीस ॲड मनमोहन चोणकर, हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष श्री सुभाष हरचेकर आणि कार्यकारणी मंडळाचे पदाधिकारी, पाटणकर सपत्नीक कुटुंबिय उपस्थित होते. यावेळी श्री चंद्रकांत पाटणकर यांनी संस्थेला नाना शंकरशेट यांची भव्य प्रतिमा संस्थेला भेट दिली, त्याचे अनावरण डॉ आनंद पेडणेकर यांनी केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments