Monday, August 18, 2025
घरमहाराष्ट्रएकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ’ – वनमंत्री आमदार गणेश नाईक

एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ’ – वनमंत्री आमदार गणेश नाईक

कोपरखैरणे : कराड क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या २५ व्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रम पार पडला. १९९६-९७ मध्ये फक्त ९० हजार भागभांडवलावर सुरू झालेली ही संस्था आज ३०० कोटींचा टप्पा गाठत महाराष्ट्रातील यशस्वी संस्थांपैकी एक ठरली आहे, असे अध्यक्ष आनंदराव कचरे यांनी सांगितले.

या सोहळ्यात वनमंत्री आमदार गणेश नाईक म्हणाले, “सहकार हा महाराष्ट्राचा कणा आहे. ‘एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ’ या तत्त्वावर कराड क्रेडिट सोसायटीने वाटचाल केली असून संस्थेचे बँकेत रूपांतर करण्यासाठी सर्वतोपरी मदत करू.”

कार्यक्रमात सभासदांना घड्याळांचे वाटप, तसेच लकी ड्रॉद्वारे स्कुटी, मिक्सर, ओव्हन, सायकल यांसारख्या वस्तूंचे बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी संजीव नाईक, नगरसेवक केशव म्हात्रे, समाजसेवक शिरीष पाटील, नवी बँकेचे अध्यक्ष बी.आर. सावंत, संस्थापक अध्यक्ष आनंदराव कचरे आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments