म
ुंबई (दादर) : दादर फुल मार्केटमधील नामांकित संजय को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड ची 34 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी दादर पश्चिम येथील ब्राह्मण सेवा मंडळ, भवानी शंकर रोड येथे मोठ्या उत्साहात पार पडली.
कार्यक्रमात मागील वर्षाचा इतिवृत्त वाचनानंतर सन 2025-26 साठीचा इतिवृत्त मंजूर करण्यात आला. यावेळी सभासदांच्या उपस्थितीत अनेक महत्त्वाच्या विषयांना मंजुरी देण्यात आली.
सभेत संस्थेचे सभासद, प्रसिद्धीप्रमुख व पत्रकार भीमराव बाळकाबाई हिंदुराव धुळप यांना “स्वर्गीय यशवंतराव चव्हाण पुरस्कार 2025” मिळाल्याबद्दल त्यांच्या संस्थेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
सभेतील आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे गुणगौरव सोहळा ठरला. यात सभासदांच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करून त्यांचा गौरव करण्यात आला.
या पद्धतीने संजय को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची 34 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात आणि यशस्वीपणे संपन्न झाली.