Monday, August 18, 2025
घरमहाराष्ट्रकॅन्सरग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबईतील एकमेव दहीहंडी – दहीकाला उत्सव २०२५ दादरमध्ये उत्साहात संपन्न

कॅन्सरग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबईतील एकमेव दहीहंडी – दहीकाला उत्सव २०२५ दादरमध्ये उत्साहात संपन्न

्रतिनिधी : “बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाउले…” या संतवचनांच्या प्रेरणेने धगधगती मुंबई आयोजित व शिवसेना विभाग क्रमांक १० पुरस्कृत, तसेच माहीम विधानसभा निरीक्षक यशवंत विचले आणि संपादक भीमराव धुळप यांच्या पुढाकारातून दादरमध्ये दहीकाला उत्सव २०२५ भव्य उत्साहात पार पडला. विशेष म्हणजे हा उत्सव कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी आयोजित करण्यात आलेला मुंबईतील एकमेव दहीहंडी सोहळा ठरला.मुंबईतील शेकडो गोविंदा पथकांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवला. काही पथकांनी पारितोषिक न घेता आयोजकांच्या कार्याला सलामी दिली व सहकार्य केले. पाच थरांसाठी ५०१ रुपये, तर सहा थरांसाठी ११११ रुपये सन्मानचिन्ह तसेच केंब्रिज शर्ट देण्यात आला. याशिवाय दोन गोविंदा पथकांनी सात थरांची सलामी दिल्याबद्दल त्यांना ५,००० रुपये रोख व इतर सप्रेम भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.या सर्वांमध्ये अमर सुभाष गोविंदा पथकाने तब्बल आठ थर लावून मानाची दहीहंडी फोडण्याचा मान पटकावला. उद्घाटनासाठी सहयोग मित्र मंडळ, कुंभारवाडा-दादर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.आयोजकांनी संकल्प केल्याप्रमाणे या उत्सवातून मिळालेल्या निधीतून टाटा रुग्णालयातील काही कॅन्सरग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत करण्यात आली तसेच केम रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान देण्यात आले.कार्यक्रमाला युवा सेनेचे सचिव साईनाथ दुर्गे, उपविभाग प्रमुख सिद्धार्थ चव्हाण, कैलास पाटील, सिने अभिनेते अभिजित कदम, पत्रकार विवेक पाटकर, केतन खेडेकर यांच्यासह शिवसेनेचे अनेक आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.सुयोग्य नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी धगधगती मुंबईचे संपादक भीमराव धुळप व माहीम विधानसभा निरीक्षक यशवंत विचले यांचे विशेष कौतुक करण्यात आले.हा दहीहंडी उत्सव केवळ खेळ-उत्सव ठरला नाही तर ‘माणुसकीचा सोहळा’ ठरून समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण केला आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments