Monday, August 18, 2025
घरमहाराष्ट्रफियाट कंपनीतील हजार कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी नाथाभाऊ शेवाळे यांचा आमरण उपोषणाचा इशारा

फियाट कंपनीतील हजार कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणी नाथाभाऊ शेवाळे यांचा आमरण उपोषणाचा इशारा

रांजणगाव : रांजणगाव औद्योगिक क्षेत्रातील फियाट इंडिया लि. कंपनी मधील वरिष्ठ अधिकारी व माथाडी कामगारांनी सुमारे हजार कोटी रुपयांचा महसूल शासनाला बुडवल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. या गंभीर भ्रष्टाचार प्रकरणी तातडीने कारवाई करावी, अन्यथा आमरण उपोषण करू, असा इशारा जनता दल सेक्युलरचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी दिला आहे.

शेवाळे यांनी दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी कामगार मंत्री व प्रधानसचिव, कामगार यांना याबाबत निवेदन दिले होते. त्यावर शासनाने गंभीर दखल घेत पुणे जिल्हा माथाडी बोर्ड यांना चौकशीचे आदेश दिले. या चौकशीत संघटनेने बोगस खाते उघडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे व शासनाचा जवळपास 1000 कोटी रुपयांचा महसूल बुडवल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी पुणे माथाडी बोर्ड अध्यक्षांनी पोलीस चौकशीचे आदेश देऊन शासनास सविस्तर अहवाल सादर केला आहे. या अहवालात कंपनी व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकारी व माथाडी कामगारांनी कायद्याची पायमल्ली करून प्रचंड भ्रष्टाचार केल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई करून शासनाचा बुडवलेला महसूल वसूल करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
दरम्यान, सदर भ्रष्टाचार प्रकरणात दोषींवर त्वरित कारवाई न झाल्यास, नाथाभाऊ शेवाळे यांनी 25 ऑगस्ट 2025 पासून मुंबईतील टाटा हाऊस, फोर्ट या ठिकाणी आमरण उपोषण करण्याचा लेखी इशारा शासनाला दिला आहे.
RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments