कराड (विजया माने) : अक्षर मानव संघटना महाराष्ट्र राज्य व राज्य परिवहन विभाग शाखा कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक १५ ऑगस्ट रोजी कराड बस स्थानक येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरासाठी महालक्ष्मी रक्तपेढीचे मोलाचे सहकार्य लाभले.
या प्रसंगी राज्य परिवहन विभाग कराड शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच अक्षर मानव संघटनेचे राज्य संघटक व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. सुजित चव्हाण यांनीही शिबिराला भेट देऊन प्रोत्साहन दिले.
विशेष म्हणजे, रक्तदात्यांना अक्षर मानव संघटनेकडून ५० वाचनीय पुस्तकं भेट म्हणून देण्यात आली. ही पुस्तकं समाज, कुटुंब आणि व्यक्तीला शांत व सुखी जीवनासाठी मार्गदर्शक ठरणारी असल्याचे आयोजकांनी सांगितले. ज्यांना ही पुस्तकं आपल्या उपक्रमासाठी हवी असतील त्यांनी सुजित चव्हाण (मो. ९५२७२१२२३३) यांच्याशी संपर्क साधावा. याचा पोस्टल खर्च संघटनेकडून करण्यात येतो.
शिबिराचे आयोजन यशस्वी करण्यासाठी सातारा जिल्हा कार्यकारिणीच्या कार्यवाह ऍड. वैशाली सोनावले यांनी मेहनत घेतली. तसेच पत्रकार विजया माने या देखील उपस्थित होत्या.
या कार्यक्रमास कराड बार असोसिएशनचे अध्यक्ष दीपक थोरात, सहसचिव मिसार शेख, अॅड. शेजवळ सर, तसेच रा.प. मंडळ कर्मचारी महेश पाटोळे यांनी सदिच्छा भेट दिली. तर ह्यूमन राईट्स कार्यकर्ते किशोर जाधव सर यांनी रक्तदान करून सामाजिक कर्तव्यही पार पाडले.
या रक्तदान शिबिरातून समाजात रक्तदानाचे महत्त्व पटवून देत, सामाजिक बांधिलकीची नवी जाणीव घडवण्यात आली.