मुंबई( मोहन कदम / शांताराम गुडेकर) : कोकणातील माणूस हा गणेशोत्वात मनसोक्त मजा करतो.कोकणात गणेशोत्सवाचं महत्व अधिक आहे. तसेच गणेशोत्सवात जाकडीनृत्य म्हणजेच शक्तीतुरा नृत्याचे महत्त्व आहे.शक्तीतुरा हे कोकणच्या संस्कृतीचे ठसकेबाज वैशिष्ट्य म्हणावे लागेल.रत्नागिरी,सिंधुदुर्ग रायगड मध्ये हा नृत्य प्रकार मोठ्या प्रमाणात आढळतो.कुणबी समाजा तील श्रमजीवी शेतकरी वर्गाचा हा हक्काचा नृत्य प्रकार म्हणून प्रसिध्द आहे. – नृत्यातला थाट, गाण्याचा तालही व संगीत साधने कालपरत्वे बदलल्याने त्याचं मूळ स्वरुप पूर्णपणे न बदलल्याचा अनुभव हे नृत्य पाहताना येतो.रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील कासार कोळवण गावचे सुपुत्र विजय शंकर करंबेळे(प्रभाग संघटक मनसे,जोगेश्वरी विभाग)यांच्या तर्फे आपल्या मूळ गावी म्हणजे कासार कोळवण येथे प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात कोकणातील लोककला टिपरी न्युत्य फुगडी, व नाच अशा सांस्कृतिक कार्यक्रमाना प्रोत्साहन देऊन ही कला जतन करून उन्नती वाढविण्याचे काम वडिलोपार्जित करत आले आहेत.यावर्षी गणेशउत्सवामध्ये बुधवार दि. २७ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ९ वा.साई कृपा टिपरी न्युत्य कासार कोळवण. शाहीर गायिका सौ. पायल प्रशांत करंबेळे यांचा टिपरी नूत्य (फुगडी ) कार्यक्रम सादरीकरण होणार आहे. तर नामांकित बुवा यांचा शक्ती -तुरा जंगी सामना रविवार दि.३१ ऑगस्ट २०२५ रोजी ठीक ९ वा. मु. पो. कासार कोळवण(उगवती वाडी), ता. संगमेश्वर, व्हाया- देवरुख जि. रत्नागिरी येथे कॅसेट शक्तिवाले शाहीर श्री सचिन कदम बुवा खेड विरुद्ध तुरेवाले शाहीर श्री देवेंद्र झिमन बुवा लांजा. यांचा शक्ती – तुरा डब्बल बारी कार्यक्रम होणार आहे. दरम्यान मार्लेश्वर पंचक्रोशी पोलीस पाटील व तंटा मुक्त अध्यक्ष व राजकीय पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ सोहळाही पार पडणार आहे.तरी या कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी आपण मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पंचक्रोशीतील तमाम रहिवाशी यांना करण्यात आले आहे.
२७ ऑगस्टला कासार कोळवण येथे मनसे तर्फे टिपऱ्या आणि ३१ ऑगस्टला शक्ती तुऱ्याचा जंगी सामना
RELATED ARTICLES