Monday, August 18, 2025
घरमहाराष्ट्रश्री ज्योतिर्लिंग विद्यालय जिंती येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

श्री ज्योतिर्लिंग विद्यालय जिंती येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

कराड(अमोल पाटील) : जिंती तालुका कराड येथे श्री ज्योतिर्लिंग विद्यालय जिंती स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला.ध्वजारोहण ज्ञान प्रबोधिनी फाउंडेशन जिंती चे पदाधिकारी व शालेय व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ञ सदस्य माननीय श्री अमर आत्माराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमा वेळी अमर पाटील म्हणाले श्री अमर पाटील यांनी भाषणात भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याचा अभिमान सर्वांनी बाळगावा त्याचबरोबर आता आपला लढा आपले व्यक्तिमत्व घडवण्यासाठी असणार आहे हे लक्षात घ्यावे, नोकरी व्यवसायासाठी सध्या जीवघेणी स्पर्धा असून करिअरच्या अनेक संधी निर्माण होताना नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून स्वतःला घडविले पाहिजे असा आत्मविश्वास ही विद्यार्थ्यांना दिला शैक्षणिक उपक्रमासाठी ज्ञान प्रबोधिनी फाउंडेशन आपणास सहकार्य करत राहील असा विचार मांडला.
विद्यालयात होणाऱ्या विविध उपक्रमाविषयी समाधान व्यक्त केले व विद्यालयाच्या गुणवत्ता वाढीसाठी शुभेच्छा दिल्या.

ज्ञान प्रबोधिनीचे पदाधिकारी मा श्री संजय खराडे उपस्थित होते या कार्यक्रमास जिंती गावातील महसूल अधिकारी शीतल पाटील मॅडम, पोलीस पाटील मा. श्री संतोष पाटील, माजी मुख्याध्यापक श्री ए आर पाटील सर, पत्रकार व ग्रामपंचायत सदस्य मा. श्री राजेंद्र पाटील, श्री विश्वासराव पाटील, श्री संजय पाटील आप्पा, अशोक पाटील, महसूल विभागाचे कर्मचारी श्री श्रीकांत साळुंखे इत्यादी ग्रामस्थ कार्यक्रमास उपस्थित होते विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अशोक कोठावळे यांनी उपस्थित सर्व ग्रामस्थांना, विद्यार्थ्यांना व पालकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री संभाजी खोचरे सर यांनी सर्वांचे स्वागत केले व विद्यालयात चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षिका सौ वनिता कुंभार मॅडम सौ रूपाली माळी मॅडम, श्री दिनकर आंबवडे सर, लिपिक श्री गणेश साळुंखे सर, श्री संदीप मोहिते दादा यांनी सहकार्य केले.
उपस्थितांचे आभार विज्ञान शिक्षक श्री गणेश तपासे सर यांनी मांडले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments