मुंबई (शांताराम गुडेकर) : मैत्रेय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचालित जी. के.एस. कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ,खडवलीच्या संचालिका सौ.कविता शिकतोडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (दि.१५ ऑगस्ट) महाविद्यालयात ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एल.जाधव सर यांच्या हस्ते आपल्या सार्वभौमतत्वाचे व स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणजे राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला.तसेच याप्रसंगी उपप्राचार्य श्री.प्रशांत तांदळे सर ,कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.विकास सावंत सर उपप्राचार्य श्री.शफीक शेख सर,श्री. ससाने सर व सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.ध्वजारोहणासाठी इयत्ता बारावीचा विद्यार्थी कु.प्रथमेश शेळके यांनी परेड दिली.त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत व ध्वजगीत गाण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांनी कु.जानवी, वृषाली,आदिती, मानसी यानी ” जय जय महाराष्ट्र माझा ” गीत गाण्यात आले.त्यानंतर मोठ्या आनंदाने लेझीम सादर करण्यात आले.लेझीम साठी कु.श्वेता,अफ्रीन,सुचिता,रसिका या विद्यार्थिनी सहभागी घेतला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी .एल .जाधव सर यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्रेरणादायी विचार मांडून देशातील तरुण पिढीला मोलाचा संदेश दिला.क्रीडा शिक्षिका हर्षदा विशे मॅडम यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
जी.के.एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ,खडवली तर्फे ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा
RELATED ARTICLES