Monday, August 18, 2025
घरमहाराष्ट्रअदानी छोडो धारावी, धारावी बचाव आंदोलनाचा तिरंगा यात्रेतून इशारा

अदानी छोडो धारावी, धारावी बचाव आंदोलनाचा तिरंगा यात्रेतून इशारा

मुंबई : धारावीतील सव्वा लाख झोपडपट्टीवासिय दुकानदार,व्यावसायिकांचे धारावीतच पुनर्वसन करा,प्रत्येक पात्र-अपात्र झोपडपट्टीधारकास ५०० चौ.फु.चे घर द्या,मुलुंड – देवनार-गोवंडी डंपिंग ग्राउंडवर आम्ही जाणार नाही असे स्पष्ट संदेश अदानी कंपनी आणि राज्य सरकारला देण्यासाठी धारावी बचाव आंदोलन या संघटनेतर्फे आज शुक्रवारी सायंकाळी स्वातंत्र्यदिनी धारावीत *’धारावी जोडो तिरंगा यात्रा’* काढण्यात आली.बहुसंख्य धारावीकरांना धारावीबाहेर फेकण्याचे कारस्थान तयार झालेले आहे,असा आरोप सरकारवर करीत धारावी छोडो अदानी असा इशारा धारावी बचाव आंदोलन या संघटनेने अदानी कंपनीस आज या यात्रेच्या निमित्ताने दिला आहे.
आम्ही सर्व धारावीकर एक आहोत आम्ही कोणाही धारावीबाहेर जाणार नाही हा एकतेचा संदेश या धारावी जोडो तिरंगा यात्रेतून देण्यात आला आहे,असे धारावी बचाव आंदोलनाचे एक प्रमुख नेते माजी आमदार बाबुराव माने यांनी सांगितले.
धारावी जोडो तिरंगा यात्रा ही आज सायंकाळी ४.३० वा. कुंभारवाडा नाका हाॅटेल बिस्मिल्ला येथून निघून ही यात्रा अन्नवेल हाॅटेल संविधान चौक येथे शांततेत समाप्त झाली.सुमारे एक कि.मी.ची ही पदयात्रा होती.धारावी के सभी झोपडाधारकों को ५०० चौ. वर्ग फूट का मकान दो! धारावीकरो को गोवंडी देवनार- मुलुंड कचरापट्टी पर उखाड फेकणे की साजिश नाकाम करो,धारावी के सभी मकान-दुकानों को पात्र कर धारावी मे ही पुनर्वसन करो,धारावीकरांची एकच आस धारावीकरांचा धारावीतच पुनर्विकास,नही जायेंगे,नही जायेंगे धारावी के बाहर नही जायेंगे असे संदेश लिहिलेले फलक आणि तिरंगे झेंडे हाती घेत ही यात्रा निघाली. पहले लढे थे गोरोसे अब लढेगे चोरोसे,अदानी हटाव,धारावी बचाव,जो सरकार निक्कमी है ओ सरकार बदलनी है, अदानी-मोदी भाई भाई देश की मलई खाई, भारत माता की जय,धारावी बचाव आंदोलनचा विजय असो, जिंदाबाद जिंदाबाद धारावी बचाव आंदोलन जिंदाबाद अशी जबरदस्त घोषणाबाजी करीत ही यात्रा धारावीच्या संविधान चौकात शांततेत समाप्त झाली.या यात्रा मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून धारावीतील झोपडपट्टीवासियांनी तिचे जोरदार स्वागत केले.
धारावी जोडो तिरंगा यात्रेत धारावी बचाव आंदोलनाचे एक प्रमुख नेते, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी बाबुराव माने,शेकापचे राजेंद्र कोरडे,अनिल शिवराम कासारे,शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला उपविभागप्रमुख मंजू वीर,एकता असोसिएशनच्या इशरत खान,सपाचे रहिम मोटारवाला, समाजसेवक आझम जाला,कुसुम गौड,नसीरुल हक,शेकाप विद्यार्थी संघटनेच्या सौम्या कोरडे,आम आदमीचे राफेल पाॅल,गौतमी जाधव, कृष्णा गायकवाड, संतोष तांबे हे समाजसेवक तसेच बसपाचे संजीवन जैस्वाल आदींसह असंख्य धारावीकर सहभागी झाले होते.
*दिड हजार एकर जमिन अदानीस कशाला?*
ब्रिटीश राजवट ही अन्याय करणारी होती.म्हणूनच महात्मा गांधींना ब्रिटीशांना छोडो भारताचा नारा द्यावा लागला.हा नारा गांधीजींनी ८ ऑगस्ट १९४२ मुंबईतच ऑगस्ट क्रांती मैदानातून दिला.आता धारावीकरांवर अन्याय करण्यास निघालेल्या अदानी कंपनीस आम्ही छोडो धारावी हा इशारा आज १५ ऑगस्ट रोजी मुंबईतील धारावीतून देत आहोत,त्यासाठीच आज आम्ही धारीवी जोडो तिरंगा यात्रा आज काढली असे पत्रकारांशी बोलताना धारावी बचाव आंदोलनाचे नेते बाबुराव माने यांनी सांगितले. जिथे ६०० एकर जमिनीवर सर्व धारावीकरांना ५०० चौ.फु.चे घर मिळेल असे असतानाही सरकार अदानी कंपनीस १५०० दीड हजार एकर जमिन का देत आहे,असा सवाल बाबुराव माने यांन या यात्रेनंतर पत्रकारांशी बोलताना केला.
शेकापचे राजेंद्र कोरडे म्हणाले कुंभार व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी जास्त जागा लागते.म्हणून कुंभारवाड्यासाठी राज्य सरकारने मास्टर प्लॅन तयार करावा.तसेच कोळीवाड्यांचे सीमांकन करण्यात यावे.हे झाले तरच कोळी बांधवांना न्याय मिळेल असेही कोरडे म्हणाले.
अनिल कासारे म्हणाले धारावी बचाव आंदोलन या आमच्या संघटनेचा धसका अदानी कंपनीने घेतला आहे.म्हणूनच त्यांनी १२ ऑक्टोबरनंतर धारावीत घरांचे सर्व्हेक्षण होणार नसल्याचे जाहीर केले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments