Monday, August 18, 2025
घरमहाराष्ट्रराष्ट्रभक्तीने भारलेल्या सायकल रॅलीतून ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाचा जागर

राष्ट्रभक्तीने भारलेल्या सायकल रॅलीतून ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाचा जागर

प्रतिनिधी : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘घरोघरी तिरंगा – घरोघरी स्वच्छता’ अभियानात केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विविध उपक्रम राबविण्यात येत असून आज स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगा सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका मुख्यालयात आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी झेंडा दाखविल्यानंतर तिरंगा सायकल रॅलीस प्रारंभ झाला. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार व डॉ.राहुल गेठे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.भागवत डोईफोडे, शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सत्यवान उबाळे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे व श्रीम.स्मिता काळे, अति.शहर अभियंता श्री.अरविंद शिंदे आणि इतर विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

सायकल हे प्रदूषण विरहित वाहन असून सायकल रॅलीव्दारे ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा देत राष्ट्रप्रेमाचे महती दर्शविण्यात आली तसेच पर्यावरणाचे महत्वही अधोरेखित करण्यात आले. 70 हून अधिक सायकलपटूंनी या तिरंगा रॅलीमध्ये उत्साहाने सहभागी होत सीवूड ग्रँड सेंट्रल नेक्सस मॉलपर्यंत देशप्रेम व स्वच्छताविषयक जनजागृती केली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments