प्रतिनिधी :
शारदा विद्या मंदिर सेमी आणि एस. व्ही. एम. इंग्लिश स्कूल सेक्टर ८ कोपरखैरणे नवी मुंबई यांच्या वतीने देशाचा स्वातंत्र्य दिन उत्साहात पार पडला .संस्थेचे मार्गदर्शक बाबुराव दादा संकपाळ, परमार्थ प्रेमी ह.भ .प. कोंडीराम महाराज शिंदे,सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणदादा कदम, DDM न्यूजनेटवर्कचे भिमराव धुळप, सुयश सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे उपाध्यक्ष आनंदा संकपाळ, सचिव अंकुश संकपाळ, सदस्य मारुती सकपाळ तसेच महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानचे सल्लागार श्रीरंग मोरे ,अध्यक्ष सुरेश शिंदे, उपाध्यक्ष राजेंद्र मोरे, उपसचिव पांडुशेठ वाळणेकर, विठ्ठल बुवा तोरणे, सुभाष कदम, विष्णु शिंदे सर,राजेश देसाई, संजय मोरे, किसन शिंदे, राजाराम कदम, सुनिल संकपाळ, मिलिंद संकपाळ यांच्या उपस्थितीमध्ये स्वातंत्र्य दिन व आरोग्य शिबिर असे दोन्ही कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले .आरोग्य शिबिरामध्ये विभागातील नागरिकांनी सहभाग नोंदविला व सेवेचा लाभ घेतला .
ह.भ.प. कोंडीराम महाराज शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले . तर बाबुरावदादा संकपाळ आणि लक्ष्मणदादा कदम यांनी पूजन केले . सदर प्रसंगी चिमुकल्या बालकांनी भाषणे केली व नृत्य सादर करून देशाप्रती आदर भावना व्यक्त केल्या व मान्यवरांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले .
अध्यक्ष श्री रमेश संकपाळ सर यांनी सुत्रसंचलन केले तर दिपाली संकपाळ मॅडम यांनी आभार मानले .
त्यानंतर भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त
शारदा विद्या मंदिर प्रि स्कुल सेक्टर 8 कोपर खैरणे येथे महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानचे संस्थापक व सर्व पदाधिकारी हे नशामुक्ती जागृती अभियान रॅलीमध्ये पोलिस व विद्यार्थ्यांसमवेत सहभागी झाले .