सातारा(अजित जगताप) : भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या तिरंगा ध्वजावंदन कार्यक्रमानिमित्त साताऱ्यात घर घर तिरंगा इटलीने आनंद द्विगणित केला आहे.
सातारा शहरातील आजाद नगर मध्ये राहणाऱ्या देशप्रेमी सौ. वंदना समीर
वहागावकर यांनी समाज माध्यम व प्रसारमाध्यमाच्या द्वारे हर घर तिरंगा … हे बोधवाक्य ऐकले. आणि आपणही स्वातंत्र्य दिनचा वेगळ्या पद्धतीने साजरा करावा. अशी मनाशी खुणगाट बांधली.
सकाळी ध्वजवंदन झाल्यानंतर हर घर तिरंगा अभियान साजरा करण्यासाठी त्यांनी नाश्त्याला इडलीचा बेत केला. नवलाई ची गोष्ट म्हणजे प्रत्येकाच्या ताटामध्ये तिरंगा इडली व चटणी पाहून सर्वांनाच स्वातंत्र्यदिनानिमित्त नाश्त्यामध्ये तिरंगा रंग असलेली इडली पाहून आस्वाद घेतला. नेहमीप्रमाणे वेगवेगळ्या सणा दिवशी वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात .परंतु ,प्रथम तिरंगा इडली सर्वांना आवडली.
गाजराच्या रस काढून भगवा रंग आणि कोथींबीरीच्या रसातून हिरवा रंग तसेच इडलीच्या पिठाचा पांढरा रंग अशी सजावट करण्यात आली होती. त्यामुळे तिरंगा इडली असं त्याचे रूप निर्माण झाले.
देश प्रेमी संगीत व गीतांच्या निनादात सर्व कुटुंब व नातेवाईकांनीही तिरंगा इडली खाऊन मनसोक्त आस्वाद घेतला.
आज सातारा जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी ध्वजावंदना निमित्त एकमेकांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. अनेक व्यावसायिकांनी अत्यंत खुबीने जाहिरात बाजी करण्यासाठी सवलतीचा ही वर्षाव केला आहे .औंध या ठिकाणी ४० वर्षापासून तिरंगा ध्वजाला मोफत इस्त्री करून दिली जाते. त्याचबरोबर १५ ऑगस्ट १९४७ साली साताऱ्यामध्ये तिरंगा ध्वज फडकवण्यात आला होता .याची आठवण म्हणून सामाजिक कार्यकर्त्यांनीही राजवाडा परिसरात देश प्रेमाने ओथंबलेला कार्यक्रम केला. तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत तिरंगा ध्वजा वंदन करण्यात आले .
७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सातारा जिल्ह्यात अनेकांनी जिलेबी विक्रीसाठी स्टॉल उभारले होते.
सातारा जिल्हा अन्न व औषध प्रशासनाने बस स्थानक व सार्वजनिक ठिकाणी असलेल्या परवानगी विना जिलेबी विक्री कडे दुर्लक्ष केले होते.तसेच सातारा नगरपालिका हद्दीमध्ये अतिक्रमण करून अनेकांनी जिलबी विक्रीचे स्टॉल उभे केले होते. त्यामुळे वाहतुकीला चांगलाच अडथळा निर्माण झाला होता. समाधानाची गोष्ट म्हणजे स्थानिक कलावंतांनी तयार केलेल्या जिलेबीला उदंड प्रतिसाद लाभला.
सायंकाळपर्यंत अनेकांची गुणवत्ताधारक व चविष्ट जिलेबी विक्री झाल्यामुळे यंदाचा स्वातंत्र्य दिन सर्वांच्याच लक्षात राहिला. मधुमेहाचे वाढते प्रमाण पाहता गतवर्षापेक्षा यंदाच्या जिलेबीची खरेदीमध्ये घट झाल्याचे अनेकांनी मान्य केले. महिला बचत गटांनी तयार केलेल्या जिलेबी आणि फरसाण विक्रीला मात्र उदंड प्रतिसाद लाभला. अशी माहिती महिला मंडळांनी दिली आहे.
___________________
फोटो — स्वातंत्र्यदिनानिमित्त गरगर तिरंगा इडलीने स्वातंत्र्य दिनाची आठवण.. (छाया- निनाद जगताप सातारा)