उंडाळे (प्रताप भणगे ) : महाराष्ट्र शासन वन विभागामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या अभ्यास दौऱ्याचा एक भाग म्हणून वन प्रशिक्षण संस्था, चिखलदरा सत्र क्रमांक ६२ चा अभ्यास दौरा बुधवारी हुंबरबन हॉटेल, उंडाळे येथे संपन्न झाला. या दौऱ्याचे प्रमुख मा. श्री. अमितराज चव्हाण असून, त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व अधिकारी व प्रशिक्षण वर्गातील सदस्य पहिल्यांदाच आपल्या भागात आले होते.
या निमित्ताने उंडाळे गावातील तंटामुक्ती अध्यक्ष श्री. धनाजी पाटील (DSP), श्री. अक्षय पाटील आणि अमितराज मित्र मंडळ यांच्या वतीने सर्व अधिकारी वर्गांचा सत्कार करण्यात आला.
दौऱ्यात मा. श्री. सुधीर आकेवार सर (दौरा प्रमुख), मा. श्री. धार्माधिकारी सर (दौरा मार्गदर्शक), मा. दुर्वे सर (फिजिकल ट्रेनर) तसेच सर्व नियतक्षेत्र अधिकारी उपस्थित होते. यावेळी बिबट्या व इतर वन्यप्राण्यांना सुरक्षित पद्धतीने कसे सामोरे जावे आणि विविध परिस्थिती हाताळाव्यात याबाबत मौल्यवान मार्गदर्शन करण्यात आले.
दौऱ्यादरम्यान पुढील काही दिवसांत आपल्या भागातील सर्व खेड्यांतील शेतकऱ्यांसाठी वन्यप्राण्यांपासून बचाव व सहजीवन या विषयावर एक दिवसीय शिबीर घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या शिबिराचा लाभ शेतकरी बांधवांना नक्कीच होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.