कराड(प्रताप भणगे) : तुळसण येथील निनाईदेवी सेवाभावी संस्थेतर्फे आज, 13 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हा परिषद शाळा विठोबाचीवाडी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास उत्तम वीर तात्या, दिलीप वीर, रोहन वीर, संजय वीर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उत्तम वीर तात्या यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. ही संस्था दरवर्षी 15 ऑगस्ट व 26 जानेवारीनिमित्त अनेक शाळांना शैक्षणिक मदत पुरवत असते.
विठोबाचीवाडी शाळेत निनाईदेवी सेवाभावी संस्थेतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप
RELATED ARTICLES