Monday, August 18, 2025
घरमहाराष्ट्रश्रीगणेशोत्सव 2025 सुव्यवस्थेसाठी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश

श्रीगणेशोत्सव 2025 सुव्यवस्थेसाठी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देश

प्रतिनिधी : नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली श्रीगणेशोत्सव 2025 सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी विशेष बैठक पार पडली. गणेशोत्सव मंडप परवानगीसाठी 147 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली असून उर्वरित मंडळांनी लवकर परवानगी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करणे, अनधिकृत बॅनरवर कारवाई, वाहतूक सुरळीत ठेवणे, पाणीपुरवठा व स्वच्छतेची काटेकोर अंमलबजावणी, निर्माल्याचे स्वतंत्र संकलन व पर्यावरणपूरक सजावटीसाठी जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले. खासगी वाहनांना बस डेपोवर थांबण्याची मुभा, विसर्जन स्थळी उच्च-गुणवत्तेचे सीसीटीव्ही, तसेच उत्सव नावलौकिकाला साजेसा व पर्यावरणपूरक होण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्याचे आदेशही देण्यात आले. बैठकीस अतिरिक्त आयुक्त, वाहतूक पोलिस अधिकारी, विभागीय उपआयुक्त व अन्य अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments