मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील रहिवाशांना धारावीतच घर मिळावे.कोणालाही मुलुंड, देवनार कचराभूमीवर हाकलून लावून नका.सर्व धर्मियांची धारावी एक है, सर्व कारागीर,व्यावसायिकची धारावी एक है हा संदेश देण्यासाठी धारावीत शुक्रवारी १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी सायंकाळी ४ वा .धारावी जोडो यात्रा काढण्यात येणार आहे.ही यात्रा धारावी बचाव आंदोलन या संघटनेतर्फे काढण्यात येणार आहे.
स्वातंत्र्यदिन असल्याने या यात्रेत कुठल्याही निषेधाच्या घोषणा असणार नाहीत. सर्व जाती धर्मियांची, हातावर पोट भरणाऱ्या कारगिरांची, छोट्या छोट्या व्यावसायिकांची ही धारावी असल्याने एकही धारावीकर हा धारावीबाहेर मुलुंड किंवा देवनार कचराभूमीवर-डंपिंग ग्राउंडवर जाणार नाही याचा पक्का निर्धार या प्रतिकात्मक यात्रेच्या निमित्ताने करणार आहे.केवळ हाच संदेश पवित्र अशा स्वातंत्र्यदिनी सरकार आणि अदानी कंपनीस या यात्रेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.यात्रेत कुठल्याही घोषणा असणार नाहीत.हम सब एक है,धारावी एक है हा संदेश या निमित्ताने शासन,प्रशासनास देणे आणि धारावीकरांचे न तुटणारे ऐक्य अबाधित ठेवणे हाच या यात्रेचा उद्देश असल्याचे धारावी बचाव आंदोलन या संघटनेचे एक प्रमुख नेते माजी आमदार बाबुराव माने यांनी सांगितले.
धारावी जोडो यात्रेसाठी धारावी बचाव आंदोलनाचे नेते, कार्यकर्ते,पदाधिकारी आणि धारावीवासिय हे स्वातंत्र्यदिनी सायंकाळी ४ वा. धारावीतील साहिल हाॅटेल- अशोक सिल्क मिल कपौंण्ड समोर जमा होतील.येथून हम सब एक है, हम सब धारावीकर एक है, हम यही रहेगे- कही नही बाहर जायेगे,सभको यही दो ५०० चौ.फु.घर- यही हमारी मांग है अशा घोषणा लिहिलेले फलक उंचावत ही धारावी जोडो यात्रा निघेल. ही यात्रा शांततेत, कोणत्याही घोषणा न देता निघेल.यात्रेचा समारोप धारावीच्या संविधान चौकात राष्ट्र गीताने भारत माता की जय ,जय जवान जय किसान या घोषणांनी होणार आहे.
धारावीतच ५०० चौ.फु.चे घर द्या…. बाबुराव माने
धारावीतील झोपडपट्टीवासियांना ५०० चौरस फुटाचे घर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे वृत्त आहे.यावर बाबुराव माने यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली.याबाबत धारावी बचाव आंदोलन ही आमची संघटना शासन आदेशाची आम्ही वाट पाहत आहोत.सरकार कोणाला ५०० चौ.फु.चे घर देणार ? फक्त पात्र लोकांना की अपात्र झोपडपट्टीवासियांनाही देणार ? .तसेच हे घर धारावीतच देणार की धारावी बाहेर ? हे अजून सरकारने स्पष्ट केलेले नाही.हे सरकारने झाकून ठेवलेले आहे.सर्व पात्र-अपात्र झोपडपट्टीवासियांना धारावीतच ५००चौ.फु.चे घर मिळावे ही आमची मागणी आहे.सरकार जर आम्हाला धारावी बाहेर घालवून आम्हाला ५००चौ.फु.चे घर देणार असेल तर ते आम्हाला, धारावी बचाव आंदोलन चळवळीस अजिबात मान्य नाही ,असे बाबुराव माने यांनी सरकारला स्पष्टपणे बजावले.
धारावी जोडो यात्रा आयोजित करण्यासाठी माजी आमदार बाबुराव माने यांच्या अध्यक्षतेखाली आज एक बैठक धारावी येथे झाली. या बैठकीस धारावी बचाव आंदोलनाचे एक प्रमुख नेते बाबुराव माने,नसीरुल हक,अशपाक खान,अनिल कासारे,पाॅल राफेल,सुभाष पाखरे,शामलाल जैसवार,वसंत खंदारे,अन्सारभाई, अंजुम खान,इशरत खान यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीत धारावी जोडो यात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,असे बाबुराव माने यांनी सांगितले.
स्वातंत्र्यदिनी धारावी जोडो यात्रा निघणार
RELATED ARTICLES