मुंबई : दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.च्या 2025-30 या पंचवार्षिक निवडणुकीत ‘सहकार समृध्दी पॅनेल’चा विजय म्हणजे सत्याचा विजय असल्याचे आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले. समर्थ बेस्ट कामगार संघटना, बेस्ट राष्ट्रीय कर्मचारी सेना, दि इलेक्ट्रिक युनियन, एससीएसटी वेल्फेअर असोसिएशन आणि बहुजन एम्प्लॉईज युनियन या पाच संघटनांच्या एकत्रित पॅनेलने ही निवडणूक लढवली आहे.
लाड यांनी विरोधकांवर बेस्ट पतसंस्थेत भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत लोणावळ्यात बंगले खरेदी, युनियनला निधी वितरण आणि BEST विक्री प्रयत्नांचा उल्लेख केला. “डेपो विक्रीऐवजी भाड्यावर देणे” यासह पर्याय त्यांनी सुचवले. नैमितिक कामगारांचा प्रश्न, कोविड भत्ता आणि BEST कर्मचाऱ्यांचे 12 विषय मार्गी लावल्याचा उल्लेख करून लाड म्हणाले, “ही निवडणूक अस्तित्वाची लढाई असून, आम्ही ती जनतेच्या विश्वासावर जिंकू.” ‘कपबशी’ निशाणी पाच पांडवांच्या एकतेचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले आणि सर्व उमेदवारांना विजय मिळवून देण्याचे आवाहन केले.