Monday, August 18, 2025
घरमहाराष्ट्रधारावीत पत्रकार दत्ता खंदारे यांचा ५०वा वाढदिवस उत्साहात साजरा

धारावीत पत्रकार दत्ता खंदारे यांचा ५०वा वाढदिवस उत्साहात साजरा

मुंबई : साप्ताहिक भगवे वादळ चे संपादक व पत्रकार दत्ता खंदारे यांचा ५०वा वाढदिवस धारावीतील विविध सामाजिक संस्था व संघटनांच्या संयुक्त पुढाकाराने एकविरा मित्र मंडळ कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा झाला. मुंबई झोपडपट्टी पोलीस पंचायत धारावी बिट क्र.२, धारावी नागरिक समिती, फेस्कॉम-हॅपीनेस ज्येष्ठ नागरिक संघ व वुमन वेल्फेअर फोरम मुंबई यांच्या संयुक्त आयोजनात मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल इंगळे, दिलीप गाडेकर, अलका साबळे, कल्पना शिंदे, गिरीराज शेरखाने, संपादक विलास देवळेकर, दिलीप शेडगे, ईश्वर ताथवडे, शंकर बळी, राजेश खंदारे, शशिकांत सावंत, गीतकार भाई नार्वेकर, साहित्यिक प्रभू अग्रहारकर, विलास खानोलकर, कॅप्टन अमनकुमार खानोलकर, संजय चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप गाडेकर यांनी केले. भाई नार्वेकर यांनी ‘नाना-नानी पार्क’ गीत सादर केले, तर विलास देवळेकर यांनी दत्ता खंदारे यांच्या नावावर कविता सादर केली. मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून, आठवणींना उजाळा देणारी मोठ्या आकाराची फोटोफ्रेम भेट दिली. केक कापून, गाणी व भाषणांनी कार्यक्रम रंगतदार झाला. शेवटी अनिल इंगळे व दत्ता खंदारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments