सातारा : माणसाच्या रक्तात माणुसकी असेल तर त्याला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. उलट प्रेरणा मिळते. खटाव तालुक्यातील आदर्श गाव निढळ येथे सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मुख्याध्यापक पदावर कार्यरत असणारे गुरुजन श्री दीपक भुजबळ यांनी सत्तावन वेळा रक्तदान केले .आपल्या बुद्धी सोबतच शारीरिक क्षमतेचे ही दर्शन घडवले आहे. याबद्दल अनेक मान्यवरांनी त्यांचे मनापासून कौतुक केले आहे.
शिक्षण क्षेत्राचा वारसा लाभलेल्या दिपक शंकरराव भुजबळ गुरुजी यांचे आजोबा विठ्ठल गोविंद भुजबळ हे सुद्धा शिक्षक होते. त्यांच्याच वारसा श्री शंकरराव भुजबळ गुरुजी यांनी चालवला. आज दिपक भुजबळ सुद्धा शिक्षण क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करत आहेत. भुजबळ घराण्याची चौथी पिढी उच्च शिक्षण घेऊन सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून देत आहे. पत्नी कांचन योग शिक्षिका आहे. मुलगा ओंकार कॉम्प्युटर इंजिनिअरिंग होऊन सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत आहे मुलगी क्रांती Luxembourg युरोप येथे मास्टर इन सायबर सिक्युरिटी अँड डिफेन्स उच्च शिक्षण घेत आहे. वयाच्या 18 व्या वर्षी प्रथम रक्तदान केले आणि 57 व्या वर्षी 57 वे रक्तदान केले.
सातारा तालुक्यातील कोंडवे गावचे सुपुत्र असलेल्या श्री दीपक भुजबळ यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा करण्यास सुरुवात केली. गोरगरीब, कष्टकरी, शेतमजूर, दलित अशा गावकुसाबाहेरील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावण्यासाठी त्यांनी व्यक्तिगत परिश्रम घेतले. वेळेप्रसंगी स्वतःचे वेतन सुद्धा खर्च करून त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. शाहूपुरी, कोंडवे ,हामदाबाज, म्हाते खुर्द, ठोंबरेवाडी, गाढ वली, बामणोली ,आणि सध्या निढळ या शाळेत त्यांनी सेवा बजावली. सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या ३७ वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. आजही गुणवत्ताधारक विद्यार्थी श्री दीपक भुजबळ यांच्यासमोर नतमस्तक होत आहेत .हीच त्यांच्या कामाची पोहचपावती आहे. शासनाचा पुरस्कार मिळवण्यापेक्षा समाजाने दिलेला पुरस्कार कधीही श्रेष्ठ असतो. हे त्यांच्या कार्याने दाखवून दिले आहे. त्यांना निरंतर काळ ‘लोकशिक्षक, ही पदवी लोकांनी दिली आहे.
रक्तदानाबरोबरच दीपक गुरुजींनी व पत्नी सौ . कांचन दिपक भुजबळ आणि मुलगा ओमकार भुजबळ, कन्या कुमारी क्रांती भुजबळ यांनी मरणोत्तर देहदान करून आपल्या देहाचाही उपयोग समाजासाठी व्हावा. असे सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आहे. अवयव दानाचे महत्त्व ते लोकांना “आधी केले मग सांगितले “या उक्ती पटवून देत आहेत
आज अनेकदा रक्ताचा तुटवडा भासत आहे अशा वेळेला श्री दीपक भुजबळ हे स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्यास जात आहेत. तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे घेत आहेत. याचबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून साक्षरता प्रसार, साक्षरता वारी साक्षरता ज्ञानरथ अशा उपक्रमामध्येही ते सहभागी होत आहेत. त्यांनी आपल्या अल्टो गाडीमध्ये फिरती शाळा व फिरते वाचनालय सुरू केले होते. तंबूतील शाळा हा एक विशेष उपक्रम सुरू केला होता. या माध्यमातून अनेक मुलांना शाळेत दाखल केले आहे.
स्वच्छ सुंदर प्राथमिक शाळा करण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवून शाळा स्वच्छ करण्याची मोहीम राबवली.” वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” असे समजून ते प्रत्येक ठिकाणी वृक्षारोपण सुद्धा करत आहेत. बुके ऐवजी बुक पुस्तक व वृक्ष देऊन वाचन वाचन संस्कृती व वृक्षारोपण कार्यक्रम राबवत आहेत. त्यांच्या या कार्याचा अनेक संस्थांनी गौरव केला आहे.
त्यांनी गोरगरिबांच्या मुलांना मोफत लाईफ जॅकेट देऊन त्यांना पोहण्यास शिकवले. पुन्हा कोणाचाही बुडून मृत्यू होऊ नये म्हणून ते पोहण्याचा उपक्रम राबवत आहेत .आज अनेक मुलं, मुली राष्ट्रीय खेळाडू म्हणून तसेच लष्करामध्ये सेवा बजावत आहेत.देशात आणि परदेशात नोकरीवर आहेत. शैक्षणिक कार्याबरोबरच अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघामध्ये जनरल कौन्सिल मेंबर व अखिल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे संचालक व vice-chairman म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज – फुले- शाहू- आंबेडकर विचाराचा वारसा जपणाऱ्या गुरुजन श्री दीपक भुजबळ यांनी खऱ्या अर्थाने बहुजन समाजामध्ये रक्तदान व मरणोत्तर देहदान दीप ज्योत पेटवला आहे. त्यांची भावजय सौ अरुणा किरण भुजबळ या शिक्षण विभागातील एस. सी. इ. आर. टी. सहाय्यक संचालक म्हणून पुणे येथे कार्यरत आहेत. श्री भुजबळ यांच्या या यशामध्ये त्यांच्या कुटुंबीयांचा खूप मोठा वाटा आहे. त्याबद्दल त्यांनी कुटुंबीयांना आई, वडील बहिण, भाऊ, भावजय, पत्नी ,मुलगा ,मुलगी यांना ही धन्यवाद दिले आहेत.आजपर्यंत सहकार्य करणारे सर्व मित्र, अधिकारी व पदाधिकारी आणि पत्रकार यांचेही आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻
——————————
फोटो– श्री दिपक शंकरराव भुजबळ गुरुजी यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करताना डॉक्टर युवराज करपे जिल्हा शल्य चिकित्सक क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय सातारा