नवी मुंबई : सुयश सामाजिक व शैक्षणिक संस्था, नवी मुंबई आणि महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठान, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत शारदा विद्या मंदिर प्री-स्कूल, सेक्टर 8, कोपरखैरणे येथे होणार आहे.
या शिबिरात विविध आरोग्यविषयक मोफत तपासण्या तसेच कामधेनू हेल्थ केअर सर्व्हिसेस (साई डेंटल हॉस्पिटल) आणि आय केअर ऑप्टिक्स यांच्या सहकार्याने 3,500 ते 4,000 रुपयांपर्यंत खर्च येणाऱ्या काही महत्त्वाच्या तपासण्या केवळ 600 रुपयांत, रिपोर्टसहित केल्या जाणार आहेत.
विभागातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुयश सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व महाबळेश्वर तालुका प्रतिष्ठानचे सचिव रमेश संकपाळ यांनी केले आहे.
संपर्क क्रमांक: रमेश संकपाळ – 9967754544, अंकुश संकपाळ – 9967750960
, राजेंद्र मोरे – 9702827200, गोविंदशेठ शिंदे – 9869696142, पांडुरंगशेठ वाळणेकर – 9323228309, विष्णु शिंदे – 9702819493, विठ्ठल तोरणे – 7977615898 आपली नाव नोंदणी आजच करा असे आयोजकांनी कळवले आहे.