Monday, August 18, 2025
घरमहाराष्ट्रबेस्ट कामगार सोसायटीत ‘ बेस्ट परिवर्तन पॅनल ’चा वचननामा

बेस्ट कामगार सोसायटीत ‘ बेस्ट परिवर्तन पॅनल ’चा वचननामा

बेस्ट कामगार सोसायटीत ‘ बेस्ट परिवर्तन पॅनल ’चा वचननामा

मुंबई : मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन व बेस्ट कामगार क्रांती संघाच्या संयुक्त विद्यमाने बेस्ट एम्प्लॉइज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या २०२५- २०३० संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीसाठी ‘बेस्ट परिवर्तन पॅनल’ ने आपला वचननामा जाहीर केला असल्याची माहिती युनियन चे सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड व कार्याध्यक्ष पवन गायकवाड यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेत दिली.

पाच पॅनल या निवडणुकीत सहभागी झाले आहेत. मात्र आमचे पॅनल निवडून येईल असा विश्वास विठ्ठलराव गायकवास यांनी व्यक्त केला.
गायकवाड म्हणाले, बेस्ट कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी विविध आश्वासने देण्यात आली आहेत. त्यात मृत्यू अनुदान, वैद्यकीय मदत, स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करणे, गृहयोजना राबवणे, मुला-मुलींसाठी शैक्षणिक व शैक्षणिक साहित्याची मदत, महिलांसाठी विशेष योजना, निवृत्तीनंतरचे लाभ, अपंग व वारसदारांना मदत अशा १९ महत्त्वाच्या मागण्या पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

‘बेस्ट परिवर्तन पॅनल’ने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या हितासाठी पारदर्शक व प्रामाणिक कामकाज करण्याचे आश्वासन देत सर्व कर्मचाऱ्यांना मतदान करून पॅनलला विजयी करण्याचे आवाहन केले आहे. मतदान सोमवार, १८ ऑगस्ट २०२५ रोजी होणार असून सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत पार पडेल.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments