मुंबई : भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाच्या मदतीने निवडणूकीत मतदारांच्या मतांची चोरी केली आहे. मा. राहुलजी गांधी यांनी या,मतचोरीचा भांडाफोड करुन भाजपा व निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट उघड केली. मुंबई काँग्रेस अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड यांच्या आदेश अनुसार मतचोरी करणाऱ्या भाजपा सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात मुंबई काँग्रेसने आझाद मैदान येथील पक्ष कार्यालयात निषेध आंदोलन करण्यात आला.
यावेळी अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र पाल गौतम, संघटन प्रभारी प्रणिल नायर, मुख्य प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, नगरसेविका अजंता यादव, महेंद्र मुणगेकर, कचरू यादव, बी के तिवारी इत्यादी नेते यावेळी उपस्थित होते.