प्रतिनिधी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्रमांक १४ चे शाखाप्रमुख अभिलाष कोंडविलकर, महिला शाखा संघटक सौ. वनिता दळवी यांच्या पुढाकाराने तसेच रोटरी क्लब ऑफ बोरीवली यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गणेश मूर्ती तयार करण्यासाठी लहान मुलांचे प्रशिक्षण शिबीर वैश्य समाज सभागृह, बोरीवली पूर्व येथे रविवारी आयोजित करण्यात आले होते. लहान मुले आणि मुली यांचा यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवसेना महिला विभाग संघटक सौ. शुभदा शिंदे, सौ. रोहिणी चौगुले, मुंबई विद्यापीठ अधिसभा सदस्य मिलिंद साटम, शशिकांत झोरे, सिमिंतिनी नारकर, स्मीता डेरे, अशोक म्हामूणकर, दिनेश विचारे, अमित गायकवाड, श्याम कदम आदी मान्यवर उपस्थित होते.*
बाळगोपाळांसाठी गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबीर ; शिवसेना आणि रोटरी क्लब यांचा संयुक्त उपक्रम
RELATED ARTICLES