मुंबई – धगधगती मुंबई वृत्तपत्र आणि शिवसेना विभाग क्रमांक १० यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीकाला उत्सव २०२५ उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. समाज प्रबोधन हा या उत्सवाचा मुख्य हेतू असून, प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांना हातभार लावण्याची परंपरा आयोजकांनी जपली आहे. गेल्या वर्षी रुग्णांना आर्थिक मदत देण्यात आली होती, तर यावर्षी कॅन्सरग्रस्त रुग्णांना मदत करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
दादर येथील केशव दाते उद्यान, प्रा. आगाशे भवानी शंकर रोड येथे हा उत्सव पार पडणार आहे. सुमारे दोन लाख 51 हजार रुपये (२,५१०००) एकूण बक्षिसे ५ थर ५५५/ रुपये,६ थर १,१११/ रुपये असे स्वरूप असेल. रुपयांचा खर्च दहीकाला सोहळ्यासाठी केला जाईल, तर उर्वरित रक्कम कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या उपचारांसाठी देण्यात येणार आहे.
मुंबईतील सर्व गोविंदा पथकांनी या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन आयोजक धगधगती मुंबई चे संपादक भीमराव धुळप व उपविभाग प्रमुख यशवंत विचले यांनी केले आहे.