प्रतिनिधी : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, खासदार अनिलभाऊ देसाई व आमदार सुनीलभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय विमा कर्मचारी सेनेने विमा कामगार को-ऑपरेटिव्ह बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत ऐतिहासिक यश मिळवले. ५ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या निवडणुकीत शिवसहकार पॅनेलचे सर्व २१ उमेदवार विजयी ठरले.
विजयी उमेदवारांमध्ये प्रशांत सावंत, अंकुश कदम, सचिन खानविलकर, जगदीश वेताळ, मनोहर लाड, निलेश जुवेकर, मिलिंद सारंग, केदार बोरवणकर, विजय बिरमोळे, शैलेश दाभोलकर, सुभाष शेलार, संतोष ठाकूर, आल्हाद नाईक, स्वप्निल धेंडे, प्रकाश आंग्रे, संजय चेवले, सागर खानविलकर, संतोष काकड, क्षितिजा मेश्राम, समृद्धी जाधव यांचा समावेश आहे.
मातोश्री येथे विजेत्यांचा सत्कार झाला असून, उद्धव ठाकरे यांनी भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कर्मचारी बांधवांच्या पाठिंब्याबद्दल सर्व विजेत्यांनी मनःपूर्वक आभार मानले.