Monday, August 11, 2025
घरमहाराष्ट्रनवी मुंबईत यशवंतराव चव्हाण पुरस्कार २०२५ वितरण सोहळा भव्यदिव्य उत्साहात संपन्न

नवी मुंबईत यशवंतराव चव्हाण पुरस्कार २०२५ वितरण सोहळा भव्यदिव्य उत्साहात संपन्न

वी मुंबई, घणसोली येथे यशवंतराव चव्हाण फाउंडेशन व साप्ताहिक यशवंतनीती वृत्तपत्र आयोजित “यशवंतराव चव्हाण पुरस्कार २०२५” वितरण सोहळा भव्यदिव्य उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्यहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. यावेळी सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा “यशवंतराव चव्हाण पुरस्कार २०२५” देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार विक्रम पाटील (विधान परिषद सदस्य) होते. तसेच महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे संपादक व राजकीय विश्लेषक महेश म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार व दिनमान चे संपादक विजय चोरमारे, महिला नेत्या रंजनाताई शिंत्रे, चंद्रकांत चाळके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन फाउंडेशनचे अध्यक्ष व यशवंतनीती चे संपादक संजय रत्नाबाई किसन सावंत यांनी केले होते.

यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी यशवंतराव चव्हाण यांचे पहिले मुख्यमंत्री म्हणून आधुनिक महाराष्ट्र घडवण्यातले योगदान मांडले आणि संजय सावंत यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. महेश म्हात्रे यांनी चव्हाण यांच्या वाचनाच्या आवडीबद्दल, त्यांचे विचार जनमानसात पोहोचवण्याबाबत आणि फाउंडेशनच्या कार्यपद्धतीबद्दल सविस्तर भाष्य केले.

आमदार विक्रम पाटील यांनी आपल्या भाषणात स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या आदर्शातून समाजकारणाची प्रेरणा घेतल्याचे सांगितले. पनवेल ही आपली कर्मभूमी असल्याचे नमूद करून, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांना पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी केले.

भरत नाना पाटील यांनी संयम, निःस्वार्थी कार्य आणि पक्षनिष्ठेमुळे राजकारणात संधी मिळते हे आपल्या प्रवासाच्या उदाहरणातून सांगितले. त्यांनी भारतीय जनता पक्ष सामान्य कार्यकर्त्यांना मोठ्या पदापर्यंत पोहोचवतो हे अधोरेखित केले.

यावेळी नुकतीच भारत सरकारच्या राष्ट्रीय खनिज विकास महामंडळावर (मिनिस्ट्री ऑफ स्टील) स्वतंत्र संचालक व राज्यमंत्री दर्जावर नियुक्ती झाल्याबद्दल ना. भरत नाना पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रभरातून आलेल्या मान्यवर व नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments